नक्षलवाद्यांच्या गोळीबारात आदिवासी युवक जखमी

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात रमेश दोहे हेडो (३५) हा युवक जखमी झाला. ही घटना एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत रेंगाटोला या गावी घडली.

काही वर्षापूर्वी रमेशला नक्षलवाद्यांनी पकडले होते; परंतु तो नक्षलवाद्यांच्या तावडीतून पळाला व गडचिरोली येथे राहत होता. सोमवारी रमेश रेंगाटोला गावी गेला होता.

रमेश रेंगाटोला येथे आल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळताच मंगळवारी दुपारी कसनसूर दलमच्या अ‍ॅक्शन टीमचे पाच-सहा साध्या वेषभूषेतील नक्षलवादी रेंगाटोला गावात गेले व त्यांनी रमेशला घराबाहेर बोलावून बंदुकीने त्याच्यावर गोळीबार केला.

त्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांनी रमेशवर दोन गोळ्या झाडल्या; परंतु नेम चुकल्याने तो बचावला. रमेशने आपला बचाव केला; परंतु एक गोळी त्याच्या पाठिला लागल्याने तो जखमी झाला. रमेशला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *