सिकंदराबादमध्ये इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

सिकंदराबादमधील चिकलगुडा परिसरात सोमवारी रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी आहेत.
 
चिकलगुडा परिसरातील पोस्ट ऑफिस गल्लीजवळील ही जुनी इमारत सोमवारी रात्री कोसळली. इमारतीत राहत असलेले नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांना वाचविण्यात आले आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मदतकार्य करत या नागरिकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
 
सिकंदराबाद गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, पावसामुळे इमारत कोसळल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *