बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याची भिंत ओलांडून बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या घरात रविवारी दुपारी एक युवक बंगल्याची भिंत ओलांडून घुसला. यावेळी अमिताभ घरात होते. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करत या व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव बुलट बनवारीलाल यादव (वय 25) असे असून, तो मुळचा बिहारचा रहिवासी आहे. यादव हा स्वतः ला सिंगर म्हणवून घेतो, त्याला अमिताभ यांच्यासाठी गाणे गायचे होते.
अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर दर रविवारी शेकडो चाहते त्यांना पाहता यावे, यासाठी जमा होतात. त्यातील एका चाहत्याने रविवारी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.