शशिकला यांची अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी

द्रमुकच्या खासदारांना श्रीमुखात लगावणाऱ्या अण्णा द्रमुकच्या खासदार शशिकला पुष्पा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी शशिकला पुष्पा यांनी हे कृत्य करून पक्षाची छवी खराब केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात येत आहे. दरम्यान शशिकला यांनी माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर पदाचा राजीनामा देण्याची बळजबरी करण्यात येत आहे, पण मी राजीनामा देणार नाही, असे म्हटले आहे.
 
शशिकला यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी द्रमुकचे खासदार तिरूची शिवा यांना दिल्ली विमानतळावर श्रीमुखात लगाविली. जयललिता यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे द्रमुकच्या खासदाराला मारल्याचे शशिकला यांनी म्हटले आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनस 3 वर या दोघांमध्ये वाद झाला. अखेर सीआयएसएफच्या जवानांना यांचा वाद सोडवावा लागला. हे दोघेही एकत्र चेन्नईला जाणार होते. पण, वादानंतर शिवा यांनी चेन्नईला जाण्याचे टाळले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *