जम्मू काश्मीरमधील नौगाव सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, दोन दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात यश आले.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील नौगाव सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे जवानांना आढळून आले. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पण, या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले असून, एक जवान जखमी आहे.
नौगाव सेक्टरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावण्यात आला होता. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. तर, एक दहशतवाद्यांला जिवंत पकडण्यात आले होते. हा दहशतवादी लाहोरचा रहिवाशी असल्याचे उघड झाले होते.