प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांनी कोलकात्यातील रुग्णालयात गुरूवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.
साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने महाश्वेता देवी यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
महाश्वेतादेवी लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या होत्या. हजार चौराशीर मा, ब्रेस्ट स्टोरीज आणि तीन कोरीर साध अशा त्यांच्या अनेक साहित्यकृती गाजल्या.
२३ जुलैला महाश्वेतादेवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तसेच रक्तातील संसर्ग आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचे प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
‘भारताने एक महान लेखक आणि बंगालने आई गमावली आहे. मी माझा व्यक्तीगत मार्गदर्शक गमावला असून, महाश्वेता देवींच्या आत्म्याला शांती लाभो’, असे टि्वट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.