दहशतवाद्याने केली पाकिस्तानची पोलखोल

काश्मीरच्या नौगाव सेक्टरमधून जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याने पाकिस्तानची पोल खोलली आहे. या दहशतवाद्याचं नाव बहादूर अली असून आपण लाहोरचे रहिवासी असल्याचं त्याने कबूल केलं आहे. 22 वर्षीय बहादूर अलीने आपल्याला लष्कर-ए-तोयबाने प्रशिक्षण दिल्याचंही सांगितलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) बहादूर अलीची चौकशी करत आहे.
कुपवाडा जिल्ह्यातील नौगाव सीमारेषेवर जवान आणि दहशतवाद्यांची चकमक झाली होती. यावेळी भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळाले होते. त्याची चौकशी केली असता तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *