तांदळाचे हे आहेत अनेक फायदे

रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत.

चेहऱ्यावरील डाग दूर होतात – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी उपयोगी आहे तांदूळ. तांदूळ बारीक वाटून घ्या. वाटलेल्या तांदुळाच्या पिठीमध्ये थोडेसे पाणी मिसळून ही पेस्टर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.

डोकेदुखीसाठी फायदेशीर – डोकेदुखीचा त्रास होत असल्यास शिजलेल्या भाताच्या पाण्यात एक चिमूट सुंठ पावडर मिसळून डोक्यावर लावा. यामुळे डोकेदुखीपासून सुटका होते.

जुलाबाचा त्रास होतो दूर – जुलाबाचा त्रास होत असल्यास तांदूळ बारीक वाटून घेऊन ते पाण्यात उकळवा. यात मीठ टाकून ही पेज प्या. यामुळे जुलाबाचा त्रास कमी होतो.

सतत तहान लागणे – सतत तहान लागत असेल तर तांदुळाचे दाणे दिवसातून दोन-तीन वेळा चावून चावून खा. यामुळे तहान लागणे कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *