ड्रीमगर्ल हेमा मालिनी झाली आजी

ड्रीमगर्ल हेमा मालिनी झाली आजी

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना वोहराने एका मुलाला जन्म दिलाय. ‘ड्रीमगर्ल’ने आजी झाल्याची बातमी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना दिलीय. सोबत शुभेच्छांसाठी तिने आपल्या चाहत्यांचे आभारही मानलेत.  हेमा मालिनी हिने ट्विट करताना म्हटलंय, ‘आपल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. हो, अहानाने एका मुलाला जन्म दिलाय आणि आम्ही सगळे खूश आहोत. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, असंही तिने ट्विट केलंय.

अहानाची मोठी बहिण ईशाने तिच्यासाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात चित्रपट सृष्टीतील बरेच ख्यातनाम लोक सहभागी झाले होते. अहाना ओडिसी नृत्यांगना असून फेब्रुवारी २०१४ मध्ये दिल्लीतील उद्योगपती  वैभव वोहराशी विवाहबद्ध झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *