बहिण आणि कुत्र्यांच्या सांगाड्यासोबत राहिला सहा महिने!

बहिण आणि कुत्र्यांच्या सांगाड्यासोबत राहिला सहा महिने!

कोलकाताच्या रॉबिनसन स्ट्रीट इथल्या एक घरात अजब प्रकार समोर आला आहे. पार्था डे नावाचा 44 वर्षांचा एक व्यक्ती त्याच्या बहिण आणि दोन कुत्रांच्या सांगड्यांसोबत मागील सहा महिन्यांपासून राहत आहे.

पोलिस एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचा तपास करत होते. पोलिसांना घराच्या बाथरुमध्ये 77 अरबिंद डे यांचा जळालेला मृतदेह सापडला. आगीच्या घटनेनंतर डे यांच्या फ्लॅटबाहेर दोन पोलिसांना तैनात केलं होतं. मात्र पोलिसांनी पाहिल्यानंतर डे यांचा मुलगा पार्था विचित्र वर्तन करु लागला.

पार्थच्या विचित्र हालचाली पाहून पोलिसांना संशय आला आहे. वडिलांच्या मृत्युमुळे धक्का बसल्याने पार्था असं वर्तन करत असावा, असं पोलिसांना सुरुवातीला वाटलं. परंतु चौकशी केल्यानंतर पार्थाने सांगितलं की, माझ्या मोठ्या बहिणीचा आणि दोन पाळीव कुत्रांचा सांगाडा घरात आहे.

पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली आणि एका खोलीतून पार्थची मोठी बहिण आणि दोन पाळीव कुत्र्यांचा सांगाडा सापडला. तर दुसऱ्या खोलीतून त्याच्या वडिलांनी लिहिलेली कथित सुसाईड नोट जप्त करण्यात आली.

8 जून रोजी लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये वडिलांनी लिहिलं होतं की, माझ्या मृत्युसाठी कोणीही जबाबदार नाही.

मागील वर्षी दोन्ही पाळीव कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने देबजानी दु:खी होती आणि तिने खाणंपिणं सोडलं होतं. सहा महिन्यांपूर्वीच देबजानीचा मृत्यू झाला, असं पार्था डे याने सांगितलं.

पोलिसांनी पार्थाला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही आणि कोणालाही अटक केलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. तिन्ही सांगाड्यांना तपासणीसाठी फॉरेन्सित लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *