समुद्रात दिसला एक भलामोठा विचित्र जीव

समुद्रात दिसला एक भलामोठा विचित्र जीव

जर तुम्हाला पाण्यामध्ये एखादी रहस्यमय गोष्ट दिसली तर…? तुम्ही देखील  दचकून जाल ना ? असंच काही झालंय जहाजावर असलेल्या काही लोकांसोबत.

समुद्रामध्ये जहाजावर असतांना अचानक मोठा जीव त्यांच्या जहाजासमोर आला. अरबी समुद्रातील ही घटना आहे. जेथे काह मच्छिमारांना अचानक एक मोठा जीव दिसला. पण हा जीव मृत्यू पावलेला होता आणि त्यामुळे त्याच्या खूप वास देखील येत होता.

मच्छिमारांनी त्याच्या जवळ जावून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला पण ते त्याला ओळखू शकले नाही. काही लोकं त्याला व्हेल मासा असल्याचं म्हणत आहेत तर काही लोकं एलियंन असल्याचं म्हणत आहेत.

यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मरीन सायन्सचे डायरेक्टर डॉ. गॅरी ग्रिग्स यांनी म्हटलं आहे की, हा व्हेल मासाच असावा पण त्याच्या आकारानुसार तो कोणत्या जातीचा याबाबत उत्सूकता आहे. जपानमध्येही असाच एक जीव दिसला होता त्यासा व्हेल मासा तर कोणी शार्क असल्याचं म्हणत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *