‘आप’च्या आणखी एका आमदाराची डीग्री बोगस?

‘आप’च्या आणखी एका आमदाराची डीग्री बोगस?

आम आदमी पार्टीचे आमदार व माजी कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या बोगस डीग्रीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका आप आमदाराच्या डीग्रीचा घोळ समोर आला आहे.

करोल बागचे आमदार विशेष रवी यांच्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे दोन वेगवेगळे उल्लेख आढळले आहेत. रवी यांनी निवडणुकीवेळी २०१३ साली दाखल दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बीकॉमचा उल्लेख केला असून २०१५ साली त्यांनी बीए (IGNOU) असा उल्लेख केला आहे.

जितेंद्रसिंह तोमर यांच्या बोगस डीग्रीचा वाद पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने तोमर यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. तोमर यांच्या हकालपट्टी आधीच आणखी एका आमदाराची डीग्री वादात सापडल्याने तसेच सोमनाथ भारती यांच्यावर पत्नीने आरोप केल्याने भारती सुद्धा वादात सापडले आहेत. आप आमदाराचे एकापाठोपाठ एक वाद उभा राहत असल्याने केजरीवाल यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *