घोटाळ्यातील दोन कार्यकारी अभियंते निलंबित

रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांना दंडाची रक्कम भरण्यासाठी पत्र देऊन, त्यांची जेलवारीतून सुटका करण्यासाठी मदत करणारे कार्यकारी अभियंता विभास आचरेकर व किशोर हेेेरमे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले. रस्ते घोटाळ्यात निलंबित अभियंत्यांची संख्या चार झाली आहे.
रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांना जेलची हवा खावी लागणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण कंत्राटदारांना काही अभियंते वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून रस्ते कामाच्या घोटाळ्याची शिक्षा म्हणून दंड वसूल करण्याचे पत्र अभियंता विभागाकडून पाठवण्यात आले आहे. याच मुद्यावर कंत्राटदार कोर्टात सहिसलामत सुटू शकतात. त्यामुळे कंत्राटदारांना मदत करणार्‍या अभियंत्यांची पालिका प्रशासनाने चौकशी केली असता, आचरेकर व हेरमे हे दोन कार्यकारी अभियंते दोषी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशीरा निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान अजून काही अभियंते यात अडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *