खराब रस्ते करणार्‍या ठेकेदारांना नोटिसा

शहरातील नवीन रस्ते मुसळधार पावसाने धुवून गेले. त्यामुळे खराब रस्ते करणार्‍या नऊ ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. त्वरित रस्ते दुरुस्त न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे. त्यामुळे ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूर शहरातील न्यू महाद्वार रोडवरील हिंद तरुण मंडळ ते बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, पर्ल हॉटेलसमोर, रेल्वे फाटक ते राजारामपुरी, राजहंस प्रिटिंग प्रेस ते जिल्हा परिषद रस्ता, मंगेशकर नगर सोसायटी, देवकर पाणंद पेट्रोल पंप, देवकर पाणंदमधील चव्हाण कॉलनी, लोखंडे घर ते शिवनेरी सांस्कृतिक मंडळ रस्ता, बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, बागल चौक ते तेंडुलकर फौंड्री, प्रभाग 26 मधील भारती गायकवाड ते काशीद घर, पॅव्हेलियन मैदान, शाहू कॉलेज ते यशोधन बंगला, पोलिस लाईन ते कसबा बावडा ड्रेनेज प्लॅन्ट, बापट कॅम्प, लाईन बझार, लाड चौक ते झूम प्रकल्प, रुईकर कॉलनी, व्हीनस कॉर्नर परिसरातील रस्ते, ट्रेड सेंटर ते सासने मैदान, वनविभाग ते होलिक्रॉस हायस्कूल, सिंचन भवन ते जिल्हा परिषद रस्ता आदी रस्ते नवीन रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत. सुमारे 59 लाखाचे हे रस्ते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *