हो, मी आहे दहशतवादी!

लोक मला दहशतवादी म्हणू शकतात. जर अल्लाहच्या मार्गावर लढणे दहशतवाद असेल; तर हो, मी दहशतवादी आहे, असा संदेश केरळमधील बेपत्ता झालेल्या पंधरा युवकांपैकी एका युवकाने आपल्या कुटुंबाला पाठविला आहे.

केरळातील कसरगोड जिल्ह्यातील 15 युवक काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. यामध्ये मोहंमद मारवान नावाच्या युवकाचाही समावेश आहे. हे सर्व जण इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याचा संशय आहे. मारवान याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून संदेश पाठविला होता. दरम्यान, हा संदेश आपण इसिसच्या नियंत्रणाखालील पश्‍चिम आशिया भागातून पाठविल्याचा दावा त्याने केला आहे. गुप्तचर यंत्रणांना मात्र हे युवक नक्की कोठे आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. “इसिस‘बरोबरील काम संपवून मी परत येईन. त्यानंतर मला काश्‍मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमधील मुस्लिमांना मदत करायची आहे. या ठिकाणी शिरकाण करण्यात आलेल्या मुस्लिमांचा सूड घेतल्यानंतर मी परत येईन. मुस्लिम समाजावर अन्याय सुरू असताना, मी शांतपणे घरी कसा काय बसू शकतो? माझ्या समुदायावर हल्ले केले जात असताना मी काय करत होतो, असे अल्लाह मला विचारेल. मुस्लिमांच्या संरक्षणासाठी लढणे हे माझे धार्मिक कर्तव्य आहे, असे मोहंमदने आपल्या संदेशात म्हटले आहे.

इस्लामसाठी लढताना मृत्यू झाला, तर हुतात्मा म्हणून माझी गणना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *