गुजरातला भूकंपाचा धक्का

दक्षिण गुजरातला भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून या भूकंपाची तीव्रता रिश्टेल सेक्लवर ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्का जाणवला.

सुरतपासून १४ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचा धक्का जाणविल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

मणिपूरलाही आज सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी होती. याठिकाणीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *