पेट्रोलचे दर लिटरमागे 2.25 रुपयांनी आणि डिझेलचे दर 0.42 पैशांनी उतरले असून, हे नवे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या भावात घट झाल्याने इंधनदरात कपात करण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव आणि मागील पंधरवड्यातील परकी चलन दराचा आढावा घेऊन सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्यात 1 आणि 15 तारखेला दराचा आढावा घेतात. त्यानुसार आज नवे दर जाहीर करण्यात आले.