सोलापूर, १२ जुलै, दक्षिण कोरियातून आलेल्या डॉक्टरांच्या टीमकडून शहरातील ५०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. ४५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.
सुंदरमनगर येथील मनपा शाळा क्र. २८ मध्ये सकाळी ते यावेळेत एम. ए. मागासवर्गीय संस्था स्प्रिंग ऑफ डजर्ट दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त विद्यामाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व रोगनिदान औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीसाठी दक्षिण कोरियातील डॉ. किम चॉगू, डॉ. हान थी ही, डॉ. किम चाँग वूक आदी तज्ज्ञ डॉक्टरांसह २८ जणांचे पथक होते.