काश्मीर पेटवण्यासाठी पाकचा पैसा

जम्मू आणि काश्मीरमध्ये अशांतता फैलावण्यासाठी आणि तेथील वातावरण पेटवण्यासाठी पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेने पैसा दिल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ‘आयएसआय’ने 100 कोटी रुपये काश्मीर खोर्‍यात पोहोचवले असून, आणखी 40 कोटी रुपये तयार आहेत. हाफिज सईद आणि सय्यद सलाऊद्दीन यांच्या नेटवर्कमधून पैसा पुरवून काश्मिरी तरुणांची माथी भडकवण्याचा ‘आयएसआय’चा कट असल्याचे दहशतवाद्यांच्या संदेशांमधून स्पष्ट झाले आहे.
कुख्यात दहशवाद्यांची बैठक
चारच दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी, हाफिज सईद आणि सलाऊद्दीन यांच्यात बैठक झाली. या बैठकीला जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अब्दुल रऊफ हाही उपस्थित होता. काश्मीरमधील वातावरण कायम तणाव आणि संघर्षपूर्ण ठेवण्यासाठी आणखी काय करता येईल, यावरही या बैठकीत चर्चा झाली.
 
चार कमांडरवर जबाबदारी
कुख्यात दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोर्‍यात हिंसाचार फैलावण्यासाठी पाकस्थित दहशतवाद्यांनी चार नवे कमांडर तयार केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *