बांगलादेश येथे ईदच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नमाज पठणाच्या कार्यक्रमावेळी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक जण ठार झाला असून १२ जण गंभीर जखमी आहेत. हा स्फोट गुरूवारी सकाळच्या सुमारास ढाकापासून १०० किमी अंतरावर किशोरगंज येथे झाला.
बांगलादेश येथे मोठ्या प्रमाणात ईद साजरी होत आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
किशोरगंजमधील शोलकिया ईदगाह मैदानात नमाज पठणाचा कार्यक्रय आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य नमाजावेळी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला.
या स्फोटात एक पोलीस ठार झाला तर अन्य १२ जण जखमी आहेत.
मैदानाजवळील एका घरात हे दहशतवादी लपून बसले असून त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.