झोपाळ्यावर खेळताना फास लागून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

झोपाळ्यावर खेळताना दोरीत मान अडकून फास लागून अवघ्या ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली आहे. दिया सरोदे असे त्या मुलीचे नाव असून ती पालकांसह  डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर येथील पांडुरंग कॅम्पलेक्स मध्ये राहात होती.
रविवारी दुपारी सिया घराशेजारीच लागून असलेल्या टेरेसमध्ये दोरीच्या झोपाळ्यावर खेळत होती. थोड्या वेळाने तिची आई तिला बोलावण्यास गेली असता त्यांना सियाची मान दोरीमध्ये अडकून तिला गळफास लागल्याचे दिसले. त्यांनी शेजारांच्या मदतीने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिच्यावर प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र तेथे डॉक्टरांनी सियाला मृत घोषित केले. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *