वेगाचा बादशाह उसैन बोल्ट जखमी, रिओ ऑलिम्पिकला मुकणार?

वेगाचा बादशाह उसैन बोल्ट जखमी, रिओ ऑलिम्पिकला मुकणार?

वा-याच्या वेगाने धावणारा, वेगाचा बादशाह अशी ख्याती असणारा जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट जखमी झाल्याने आगामी ‘रिओ’ ऑलिम्पिक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. बोल्टच्या मांडीला दुखापत झाल्याने त्याने जमैकाच्या राष्ट्रीय चॅम्पियन्सशीपमधून माघार घेतली असून पुढील महिन्यात होणा-या ऑलिम्पिकमधील त्याच्या सहभागाबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.
जमैकामध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक पात्रता फेरी घेण्यात आली. यामध्ये बोल्ट १०० मीटर फायनलसाठी पात्र ठरला होता. तर २०० मीटरसाठी शनिवार आणि रविवारी पात्रता फेरी घेण्यात येणार आहे, मात्र बोल्टची दुखापत त्यापूर्वीच वाढल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली.  बोल्टने  २००८ साली झालेल्या बीजिंग आणि २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्येही १०० मीटर रेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. यंदाही अशीच कामगिरी करुन हॅटट्रिक साधण्याचा त्याचा मानस होता, मात्र आता त्याच्या खेळण्याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *