बांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या

बांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. आज सकाळी एका हिंदू पुजाऱ्याचा धारधार हत्याराने हत्या करण्यात आली. राजधानी ढाक्यापासून ३०० किमीवर असलेल्या झिनाइदा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली आहे.

श्यामनंदो दास (४५) असे या पुजाऱ्याचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास मंदिरात पूजा करण्यासाठी तो झाडाची फुले तोडत होता. त्याच वेळी तीन अज्ञात इसम दुचाकीवरून तिथे आले आणि काही कळण्याच्या आत त्यांनी श्यामनंदोवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. घाव वर्मी लागल्यानं श्यामनंदो जागीच ठार झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मुस्लिमबहुल बांग्लादेशात गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक हिंदू, ख्रिश्चन, धर्मनिरपेक्ष लेखक यांना लक्ष्य केले जात आहे. हिंदू पुजाऱ्यांना लक्ष्य करण्याची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी वेळ आहे. याआधीही दोन हिंदू पुजाऱ्यांचे खून करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *