धक्कादायक ! चालकाविनाच 15 किमीपर्यंत धावली एक्स्प्रेस

विचार करा तुम्ही एका रेल्वेतून प्रवास करत आहात आणि तुम्हाला माहित पडलं की तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करत आहात त्या ट्रेनमध्ये चालकच नाही तर… ? तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. अशी घटना काल कोकण रेल्वेच्या बाबतीत घडली आहे. काल मडगाववरुन निजामुद्दीनसाठी निघालेल्या राजधानी एक्सप्रेसच्या बाबतीत अशी धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे ही घटना

राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरीच्या जवळ एका उतारावर ड्रायवरविनास जवळपास 15 किलोमीटरपर्यंत धावली. सोमवारी रत्नागिरी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला त्यामुळे कोकण रेल्वे काही काळ रखडली. त्यानंतर एका बोगद्याजवळ ती थांबवण्यात आली. ड्रायवर हा इंजिनमधून उतरुन टेक्निशिअनसोबत बोलत होते आणि अचानक एक्स्प्रेस पुढे निघाली. ही ट्रेन ड्रायवरविनाच 15 किलोमीटरपर्यंत अशीच चालत होती. पण पुढचा भाग उंच असल्याने रेल्वेची गती कमी झाली आणि ती थांबली.

रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

कोकण रेल्वेचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्तांनी ही गोष्ट नाकारली पण ट्रेन उतारावर थोडी सरकली हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. चिपळून स्थानकावर इंजिन बदलण्यात आलं होतं. त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *