जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.
सर्वेक्षणानुसार, ऑफिसात कर्मचारी अनेक कारणांमुळे सोशल मीडियाचा वापर करतात. हे करण्यामागचे सामान्य कारण म्हणजे कामातून थोडा ब्रेक घेणे. सर्वेक्षणादरम्यान ३४ टक्के लोकांचे म्हणणे होते की कामादरम्यानच्या ब्रेकसाठी सोशल मीडियाचा वापर होते. प्यू रिसर्च सेंटरद्वारे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमेरिकेतील २००३ तरुणांचा समावेश होता.
यातील २७ तरुण मित्र आणि कुटुंबियांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात तर २४ टक्के तरुण प्रोफेशनल संबंध मजबूत करण्यासाठी सोशल मिडिया वापरतात. २०
टक्के तरुण माहिती मिळवण्यासाठी सोशल साईट पाहतात, असे आढळून आले.