इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

एकाच वेळी २० उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करुन नवा विक्रम करणा-या इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील क्षमतेचे इस्त्रोने वेळोवेळी दर्शन घडवल्याचे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. या मोहीमेत पुणे आणि चेन्नईतील विद्यार्थीही सहभागी झाले. आपल्या नवीन पिढीलाही विज्ञान क्षेत्रात आवड आहे, हे ऐकूण या देशाचा एक सामान्य नागरीक म्हणूनही मला समाधान झाले, अशा शब्दात त्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *