टेस्ट ड्राईव्हसाठी नेलेली मर्सिडिज बाप-लेकाने पळवली

टेस्ट ड्राईव्हसाठी नेलेली मर्सिडिज बाप-लेकाने पळवली

टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने एका पिता-पुत्राने ४० लाख रुपयांची मर्सिडीज चोरल्याची घटना दिल्लीत घडली. राजौरी गार्डन परिसरातील शोरूममध्ये गाडी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या अनिल आनंद आणि साहिल आनंद यांनी गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी नेली आणि तिथूनच पळ काढला.

दिल्लीतील टी अ‍ॅण्ड टी मोटर्स लि. या शोरूममध्ये ६ मे रोजी अनिल आणि त्याचा मुलगा साहिल गाडी मर्सिडिज बेंझ खरेदी करण्याच्या निमित्ताने आले होते. या वेळी त्यांच्यासोबत आणखी दोन जण होते. गाडीची पाहणी केल्यानंतर त्यांनी या गाडीच्या टेस्ट ड्राईव्हची मागणी केली. एक तास झाला तरी गाडी परत न आल्याने शोरूम व्यवस्थापनाने गाडीचा शोध सुरू केला. मात्र गाडीचा शोध लागलाच नाही.

या प्रकरणी गाडी विक्रेता दीपक कुमार याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी एक महिना या गाडीचा शोध घेतला. मात्र गाडीचा शोध घेण्यास अनेक अडथळे येत होते. अखेर २० जून रोजी आनंद आणि साहिल गुरगावमध्ये येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सुरेंद्र कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *