गडचिरोलीत तीन नक्षलवादी ठार

गडचिरोलीत तीन नक्षलवादी ठार

पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या गोळीबारात रविवारी पहाटे तीन नक्षलवादी ठार झाले. ही घटना अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलपल्ली जंगलात घडली.

कोलपल्ली जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गडचिरोली पोलीसांची सी-६० व तेलंगणा पोलीसांची ग्रेहाऊंडस या संयुक्त पोलिस दलानी या परिसरात शोध मोहिम सुरू केली.

नक्षलवादी दिसताच पोलिसांनी गोळीबार केला. त्यानंतर नक्षलवादी आणि पोलीस यांच्यामध्ये बराचवेळ गोळीबार सुरू होता. या चकचकीत तीन नक्षलवादी ठार झाले.

पोलीसांनी नक्षलवाद्यांच्या तीन मृतदेहासह एक एके-४७ आणि एसएसआरसह तीन शस्त्रे ताब्यात घेतली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *