बागबान ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक – अमन वर्मा

बागबान ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक – अमन वर्मा

बॉलीवूड तसेच छोट्या पडद्यावरील चर्चित नाव म्हणजे अमन वर्मा. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी स्टारर बागबान हा सिनेमा आला होता. या सिनेमात अमन वर्माने अमिताभ यांच्या मोठ्या मुलाची भूमिका केली होती.

मात्र या सिनेमात काम करणे ही आयुष्यातील मोठी चूक असल्याचे विधान अमन यांनी केलेय. माझ्या मते बागबानमध्ये काम करुन मी आयुष्यातील मोठी चूक केली. सुरुवातीला अमिताभ यांच्या मोठ्या मुलाचा रोल दुसरे कोणीतरी करणार होते. मात्र त्यानंतर मला या रोलसाठी विचारणा झाली. 2003मध्ये बागबान आला.

या चित्रपटात एका मोठ्या मुलीच्या वडिलांचा रोल मी केला होता. मात्र त्यावेळी मी केवळ 31 वर्षांचा होतो. मी रिमी सेनच्या वडिलांचा रोल केला होता. रवी चोप्रा जवळचे असल्याने मी या रोलसाठी नाही म्हणू शकलो नाही. मी त्यांच्यासोबत खूप प्रोजेक्ट केले. बागबाननंतर मला त्याच धाटणीचे वडिलांच्या भूमिकेसाठी विचारणा होऊ लागली, असे अमन यांनी सांगितले.

सध्या अमन एक मा जो लाखो के लिए बनी अम्मा या आगामी मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *