सोलापूर – छत अंगावर पडल्याने आईसह बाळाचा मृत्यू़

सोलापूर – छत अंगावर पडल्याने आईसह बाळाचा मृत्यू़

घराचे छत पडून मातीच्या ढिगा-याच्या खाली जीव गुदमरून आईसह सहा महिन्याच्या बाळाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना करकंब (ता़ पंढरपूर) येथे घडली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. सारीका रूपेश सदावर्ते (वय ३१) व श्लोक रूपेश सदावर्ते (वय ६ महिने) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
रात्री एकच्या सुमारास छत अचानक पडले. पावसामुळे छत खराब झाल्याने पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या छताच्या बांधकामात मातीचा वापर जास्त असल्याने झोपी गेलेल्या सारीका व श्लोक यांच्या अंगावर मोठया प्रमाणात माती पडली. ज्यामुळे त्यांचा जीव गुदमरून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पंढरपूर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले़ आहेत. आईसह बाळाता मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *