कुणाच्या भावाला 95 टक्के, कुणाच्या बहिणीला 97 टक्के.. नादच खुळा.. हुशार पोरांच्या या घोळक्यामध्ये आम्हाला एक पट्ट्या गावला… ज्यानं दहावीच्या परीक्षेत आकडी येईल इतका भारी आकडा आणलाय..
जरा मार्क बघा…
मराठीत 35
हिंदी 35
इंग्रजीत पण 35
गणितात 35
सायन्सात पण 35
समाजशास्त्रातही 35
खटक्यावर बोट… जाग्यावर पलटी. ह्यो खतरनाक दाद्या कोल्लापुरातल्या शिरोळच्या अर्जुनवाडचा. भावाचं नाव इंद्रजित मोरे.
जिकलंस भावा… आता भावानं करेक्ट 35 टक्के मिळवल्यात म्हटल्यावर चर्चा तर होणारच की राव. दोस्तांनी भावाचं नाद्याबाद पोश्टरच लावलं चौकात. मग काय शायनिंगच की. वॉट्सअपवर तर भावाच्या फोटोचा पाऊस…
भावानंलय भारी काम केलंय. निकालाच्या आधी घरात वातवरण टाईट… नापास झालो… तर शंभर टक्के कानाखाली जाळ…. पण निकाल लागला.. आणि सगळी गप गार पडली.
आपला भाऊ कबड्डीचा वस्ताद हाय… एकदा एन्ट्री मारली… की चौघांना घेऊनच येतो. काटा किर्रर्रर्र… 100 टक्के मिळत्यात ओ आमास्नी कबड्डीमध्ये… पण काय करणार… आमच्याकडं 90 टक्क्याच्या पुढं पडलेल्यांचीच शिफारस लै. पण काय पण म्हणा. सगळ्या विषयात शेम टू शेम मार्क काढायचं काम चेष्टा नाय. म्हणूनच आम्ही म्हणतोय भावा… तुला पर्याय नाय…

