मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे- दुरुस्तीसाठी दोन लेन बंद

सततच्या होणा-या अपघातांची दखल घेऊन दुरुस्तीच्या कामासाठी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर अमृतांजन पुलाजवळ सोमवारी सकाळपासून दोन लेन बंद करण्यात आल्या. परिणामी या मार्गावरील खंडाळ्याच्या घाटात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

पुण्याकडे जाणा-या वाहनांच्या रांगांमुळे आख्ख्या घाटात वाहतूक मुंगीच्या गतीने पुढे सरकत आहे. अमृतांजन पुलाजवळ कायमच वाहनांचा खोळंबा होतो. त्यात सोमवारी सकाळी या मार्गावर टँकर उलटल्याने इथली वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यात दुरुस्तीच्या कामासाठी दोन लेन बंद करण्यात आल्याने वाहतुकीचा पूर्णत: बो-या वाजला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या ८ ते १० किलोमीटपर्यंत रांगा लागल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

अमृतांजन पुलाजवळ रविवारी कंटेनर उलटला होता. हा कंटेनर मुंबईहून पुण्याकडे जात होता, मात्र अपघातात त्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारा रस्ताही रोखला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *