राजस्थानात ‘मिग-२७’ विमान कोसळले

भारतीय हवाई दलाचे ‘मिग-२७’ हे लढाऊ विमान शहरातील निवासी भागात कोसळले. या दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे.

जोधपूर हवाई तळावर नेहमीप्रमाणे ‘मिग-२७’ या विमानाने नेहमीप्रमाणे सरावासाठी उड्डाण केले. काही वेळेत त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर हे विमान सकाळी ११.३० वाजता शहरातील कुरी भागतसनी हौसिंग बोर्डाच्या वसाहतीत कोसळले. विमान दुर्घटना झाल्यावर त्याला आग लागली.

अग्निशमन दलांनी आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली, अशी माहिती जिल्हा न्यायदंडाधिकारी विष्णू चरण मलिक यांनी दिली.हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले की, हे विमान कोसळल्यानंतर वैमानिकाने उडी मारून आपला जीव वाचवला.

संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा म्हणाले की, सकाळी ११.३० वाजता मिग-२७ विमान कोसळले. या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

जोधपूरचे पोलीस अधीक्षक सीमा हिंगोनिया म्हणाले की, विमानाचा भाग ज्या घरावर पडला त्याचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *