मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा एकदा तीन कार एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला असून अन्य ११ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास झाला.

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ हा अपघात झाला. या अपघात पुण्याहून मुंबईकडे येणा-या तीन गाड्या एकमेंकांना धडकल्या. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ११ जखमी आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.

याआधी, पाच जूनला महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सात महिला, चार पुरुष आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता. २५ जण जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *