दानवेना नारळ देणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पाच महिन्यांतच उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा भाजपावर्तुळात आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर रावसाहेब दानवे भाजपा प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यावेळी त्यांना केवळ ११ महिन्याचा कालावधी मिळाला.

जानेवारीत दानवे त्यांची पुन्हा फेरनिवड झाली. त्यांना तीन वर्षाचा कालावधी मिळणार होता. मात्र, गेल्या दीड वर्षात दानवे यांच्याकडून महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पक्ष बांधणी होत नसल्याने त्यांना या पदावरुन हटवण्यासाठी भाजपातील एक मोठा गट सक्रीय होता.

सध्या खडसे यांच्यामुळे भाजपाची सर्वत्र नाचक्की होत असल्याने दानवे यांची या पदावरुन उचलबांगडी करण्याचा निर्णय भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असल्याचे कळते.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक साधणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *