पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रविवारी व्हीआयपी म्हणजेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील सायरनच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राजभवनातील सुरक्षा रक्षक वाहनांचा व पायलट वाहनांचा देखील सामावेश आहे.
किरण बेदी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की रुग्णवाहिकांना आणि अग्निशमन दलाच्या वाहनाना मात्र सायरनचा वापर करता येणार आहे. मात्र, व्हीआयपी वाहनांचे विशेषाधिकार देखील रद्द करण्यात आले आहेत. व्हीआयपी वाहनांसाठी आता वाहतूक थांबविली जाणार नसून, सामान्य लोकांची या वाहनांमुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक नियमनासाठी योग्य संख्येत कर्मचारी व अधिकारी नेमण्याचे आदेश दिले असल्याचेही या प्रसिद्धीपात्राकामध्ये म्हटले आहे.
