‘स्वाभिमान’तर्फे किल्ले रायगडावर पुष्पवृष्टी

येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीकडून भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यादरम्यान ‘स्वाभिमान’ संघटनेच्या वतीने किल्ले रायगडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

युवा आमदार नितेश राणे हे ५ जून रोजी सायंकाळी रायगडावर जाऊन शिवसमाधी स्थळ, राजदरबार आणि होळीच्या माळावर शिवरायांच्या स्मृतीला वंदन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *