अंजली दमानिया यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज उपोषणाला बसणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकरलीय.

आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याची सूचना पोलिसांनी केल्याचं दमानियांनी म्हटलयं. उपोषणआधी खडसेंच्या समर्थकांनी चुकीच्या तक्रारी दाखल करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

शिवाय खडसेंच्या राजीनाम्यानं भागणार नाही, त्यांच्यापत्नी मंदाकिनी, मुलगी रोहिणी आणि सून रक्षा खडसेंनीही राजीनामा द्यावा, अशी दमानियांची मागणी आहे. त्यापूर्वी त्यांनी राळेगणसिद्धीत जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खडसेंवरील आरोपांप्रकरणी अण्णांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *