शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन

शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन

बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मात्र याला अपवाद ठरली आहे. बाळंतपणानंतर शिल्पानं फक्त तीन महिन्यांमध्ये 21 किलो वजन कमी केलं आहे. 2012मध्ये शिल्पानं बाळाला जन्म दिला होता.

वजन कमी करण्यामागे शिल्पाला मदत केली तिचा ट्रेनर विनोद चन्नानं. याबात चन्ना यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. बाळंतपणाच्या काळात चुकीचं खाणं आणि कमी चालल्यामुळे महिलांचं वजन वाढतं, असं चन्ना म्हणाले आहेत. शिल्पाचं वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच मी तिला डाएट करायला सांगितलं. तसंच भाज्या आणि फळंही खायला सांगितली, यामुळे तिचं वजन कमी व्हायला मदत झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *