मु्ंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर एकाचा मृत्यू, चौघे रुग्णालयात

लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला तर जखमी चौघा मुलांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

जखमी मुलांची वयं १२ ते १८ वर्ष असून हे सर्वजण घाटकोपर आणि कुर्ला दरम्यान स्टंटबाजी करत होते. २२ तारखेच्या रात्री शमशाद अन्सानी, समीर शेख, अमन शेख, आणि साहिल यादव हे चौघे जण स्टंबाजी करत होते.

तिकडे त्याच रात्री स्टंटबाजी करताना ३२ वर्षीय युवक इम्रान शमिउल्लाचा मृत्यू झाला. स्टंटबाजी करताना इम्रान लोकलमधून खाली पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *