महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार

महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे, ही घटना माहीम येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  अब्दुल जावेद रफिक शेख याला ताब्यात घेतले आहे.

सांताक्रूझच्या २९ वर्षीय पीडित महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत नेहमीच वाद होत असत. २० मे रोजी देखील या दाम्पत्याचे नेहमी प्रमाणे भांडण झाले होते. त्यामुळे वैतागून ती महिली माहीम स्थानकावर जाऊन बसली.

हताशपणे बसलेल्या त्या महिलेला पाहून आरोपी अब्दुलने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली.

तिचा विश्वास संपादन करुन तिचा सहानुभूती दाखवत चांगले काम पाहून देण्याचे खोटे आश्वासन दिले.

तसेच रात्र झाल्याने अब्दुलने त्या महिलेला जवळच्या हॉटेलमध्ये थांबण्याचा आग्रह केल्यामुळे ती हॉटेलमध्ये गेली.  हॉटेलमध्ये अब्दुलने तिला कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच पोलिसांच्या भीतीने त्याने रात्रीच तेथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर झालेला सगळा प्रकार लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या मदतीने अब्दुलला अंधेरी येथून अटक केली असून, न्यायालयाने त्याला २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *