मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात दोन मोठे ट्रक बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (शुक्रवार) सकाळी दोन मोठे ट्रक मुंबईच्या दिशेने जात होते. दरम्यान खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ आल्यानंतर हे दोन्ही ट्रक बंद पडले. सकाळी ऐन वर्दळीच्या वेळी ट्रक बंद पडल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे आज सकाळपासूनच द्रुतगती मार्गासह
जुन्या महामार्गावरही वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.