केरळमध्ये श्रीसंतचा ‘क्लीन बोल्ड’

केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (गुरुवार) जाहिर झाला असून, माजी भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंतचा ‘क्लीन बोल्ड‘ झाला आहे.

श्रीसंत याने नुकताच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. भाजपकडून त्याने विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतु, या निवडणुकीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांपेक्षाही त्याला कमी मते मिळाली आहेत.

श्रीसंतने ट्‌विटवरून नागरिकांचे आभार मानले आहेत. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर दाखविलेले प्रेम व आदराबद्दल धन्यवाद. यापुढेही नागरिकांसाठी काम करत राहील. दरम्यान, श्रीसंत सप्टेंबर 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्‍सिंगमध्ये अडकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *