विम्याचे पैसे मिळविण्यासाठी बहिणीची हत्या

विमा पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मावसभावानेच बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात उघडकीस आलीय.

१६ मे रोजी राखी ठाकूर या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह झरी गावातील शिवारात सापडला होता. तिच्या गळ्यावर आणि पाठीत चाकूने वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या खूनाचा ऊलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान होते. अवघ्या २४ तासात पोलीसांनी या खूनाचा ऊलगडा केला.

मावस बहिणीच्या नावाने असलेले पॉलीसीचे पैसे हडप करण्यासाठी आरोपी मंगलसिंघ ठाकुर आणि त्याच्या इतर २ सथीदारांनी ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. काही महीन्यांपूर्वी मंगलसिंघ याने राखीच्या नावावर पॉलीसी काढली होती.

पॉलीसीचे काही हप्ते त्याने भरले होते. त्यानंतर अपघाती मृत्यूनंतर मिळणारे पॉलीसीचे पैसे हडपण्यासाठी त्याने हा बनाव केल्याची माहीती ऊघड झाली. आरोपी मंगलसिंघ ठाकूर, त्याचे साथीदार मनजीतकौर आणि गुरुपालसिंघ यांना पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *