रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी घसरले

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण सुरूच आहे. रुपयाने आता 67 रुपयांची पातळी गाठली आहे. परकी विनिमय चलन बाजारात रुपया आज (गुरुवार) 23 पैशांनी घसरत 67.20 पर्यंत खाली आला. कालच्या सत्रात देखील रुपया 10 पैसे घसरणीसह 66.97 रुपयांची पातळी गाठली आहे.
 
फेडरल रिझर्व्हकडून जूनच्या अखेरीस होणार्‍या बैठकीत व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता असल्याने डॉलर वधारला आहे. 
फॉरेन एक्सचेंजकडे आयातदार आणि बँकांकडून डॉलरची मागणी वाढली आहे. परिणामी इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत देखील अमेरिकी डॉलर वधारतो आहे. 
 
सध्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 103 अंशांची घसरण झाली असून सेन्सेक्स 25,601.39 पातळीवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 29.95 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 7,840.30 पातळीवर आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *