कुपवाडा चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोमवारी रात्रापासून ही चकमक सुरू झाली असून अद्यापही चकमक सुरू आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील पहलीपुरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सोमवारी रात्री लष्करी जवानांना मिळाली. त्यानंतर या परिसरात लष्करी जवानांकडून शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरूवात केली असता भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

सुरू असलेल्या चकमकीत सोमवारी मध्यरात्रीपर्यंत एक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली.

कुपवाडा जिल्ह्यातील जुनरैशी भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सोमवार मध्यरात्रीपासून दहशतवाद्यांनी सुरु केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराचे जवान अजुनही प्रत्युत्तर देत आहेत.  अद्याप दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरु आहे. याठिकाणी लष्काराची अधिक कुमक पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *