ज्येष्ठ माजी कसोटीपटू दीपक शोधन यांचे सोमवारी अहमदनगर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. पदार्पणात शतक झळकावणारे ते भारताचे पहिले कसोटीपटू होते.
फाळणीनंतर झालेल्या (१९५२-५३) पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेतील पाचव्या कसोटीत डावखु-या शोधन यांनी पदार्पण केले. पदार्पणात त्यांनी नाबाद ११० धावांची खेळी केली. मात्र शोधन यांच्या वाटय़ाला केवळ तीन कसोटी सामने आले.
कारकीर्दीत ४३ प्रथमश्रेणी सामने खेळताना ३१ डावांत १८०२ धावा त्यांनी केल्यात. त्यात ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. शोधन यांनी मध्यमगती मा-याने ७३ विकेट टिपल्यात.