हाय हिल घालायला नकार दिला म्हणून एका महिलेला तिच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी काढून टाकण्यात आलंय.
27 वर्षांची निकोला थॉर्प ही एका फायनान्स कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून रुजू झाली होती. तिला दोन ते चार इंचांच्या हायहिल्स घालायला सांगण्यात आलं. पण तिनं दिवसभर हाय हिल्स घालून काम करायला नकार दिला.
पुरुषांना अशी बंधनं का नाहीत, असा सवालही तिनं कंपनीला केला पण त्याचं कुठलंही उत्तर न देता तिला सरळ काढून टाकण्यात आलं. आता निकोलानं याविरोधात कॅम्पेन सुरू केलंय. तसंच एक याचिकाही कोर्टात दाखल केलीय.

