कल्याणमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला, २ जखमी

कल्याणमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला, २ जखमी

कल्याण पश्चिमेकडील जोशी बागेतील एका इमारतीचा काही भाग कोसळून २ जण जखमी झाले आहेत.
जोशीबागेतील ताक या तळ अधिक दोन मजली इमारतीचा काही भाग गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत अतिशय जुनी असून ती मोडकळीस आली होती.
महापालिकेचे अधिकारी अनिल लाड पोहचले होते. त्यांनी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. पत्रकार व मिडीया चॅनल्सने लाड यांच्यकडे विचारणा केली असता घरत यांनाच जाऊन विचारा असा खुलासा लाड यांनी केला आहे. या इमारतीत 22 कुटुंबे राहत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *