पुण्यातील मंगळवार पेठ परिसरातील भीमनगर येथे भीषण आग लागली असून या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनस्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, तारेचे कुंपण आणि गल्लीबोळ असल्याचे मदतकार्य करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
भीषण आगीमुळे मंगळवार पेठ परिसरात सर्वत्र धुराचे लोट पहायला मिळत आहे. या आगीत कोणतिही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.